महापूर समन्वयाबद्दल व्यक्त केले आभार
प्रतिनिधी/इस्लामपूर
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज, शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली. दरम्यान मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. यावेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होवू पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
Previous Articleकोरोनाच्या एका अंत्यसंस्कारावर 15 हजारांचा खर्च
Next Article कोयना धरणात १०५.०५ टीएमसी पाण्याची आवक









