सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या शंभर फुटी ध्वजाचे लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पहिला शंभर फुटी ध्वज उभारण्यात आला आहे. ही अभिमानाची बाब आहे. तसेच आज दौलतनगर येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असून रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. या महारक्तदान शिबीरामध्ये 1 हजार 111 रक्तदान करणार आहेत. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी असेच लोकउपयोगी काम करुन एक आदर्श निर्माण करावा.
यावेळी प्राथमिक स्वरुपात रक्तदान करणाऱ्या दात्यांचा तसेच कोरोना संसर्गाच्या काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सत्कार मंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.









