बेंगळूर/प्रतिनिधी
दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारकांविषयी केलेल्या विधानावर दुसर्याच दिवसानंतर कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कट्टी यांनी मंगळवारी यु टर्न घेतला आणि म्हंटले की बीपीएल आणि एपीएल कार्डधारकांना लाभ मिळण्याबाबत निश्चित मापदंड नाही.
दरम्यान अन्न व पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी) कार्ड संदर्भात काही निकष आहेत. ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन, मोटर सायकल, टीव्ही, फ्रीज इत्यादी असू नयेत. जे लोक या निकषात बसत नसतील त्यांनी कार्ड परत करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे विधान केले होते.
दरम्यान बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील भाजप सरकार गरीब कुटुंबियांना बीपीएल कार्ड वितरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही या मंत्र्यांनी सांगितले. ते रागी, कॉर्न आणि तांदूळ असे मोफत धान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस व जद (एस) नेत्यांनी कत्ती यांच्या वक्तव्याचा विरोध केल्यांनतर कत्ती यांनी पत्रकारांना सांगितले की बीपीएल आणि एपीएल (गरीबी रेषेच्या वर) कार्डधारकांसाठी कोणतेही निश्चित मापदंड नाहीत आणि कोणालाही काळजी करण्याची गरज नाही कारण सरकारने या संदर्भात कोणतेही विधान जारी केलेले नाही.
आपल्या आधीच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत मंत्री कत्ती यांनी मोटरसायकल, टीव्ही, फ्रीज आणि जमीन असल्यास कार्ड रद्द केले जाईल असे कोणतेही मुख्यमंत्र्यांनी दिले नाहीत.परंतु मंत्री उमेश यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.









