प्रतिनिधी/रत्नागिरी
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच या नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून या निवडीनंतर कोकणातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
शिवसेनेच्या मुख्य प्रवक्ते पदावर खासदार संजय राऊत यांनी तर प्रवक्ते म्हणून ना. सामंत यांच्यासह दहा जणांची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ना. सामंत यांच्यावर पक्ष नेतृत्वाने उपनेते पदाची जबाबदारी सोपवली होती. या नंतर राज्य मंत्री मंडळात उच्च व तंत्र शिक्षण खात्याची कॅबिनेट पदाची जबाबदारी देऊन कोकणचा सन्मान केला होता. आता सामंत यांच्या खांद्यावर प्रवक्ते पदाची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









