बेंगळूर/प्रतिनिधी
मंत्री आनंद सिंह हे आपल्याला हवे असलेले खाते न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांनी आपल्याला हवं असलेलं खातं न दिल्यास राजीनाम्याचा इशाराही दिला आहे. पण बोम्मई यांनी हायकमांड सोबत चर्चा केली असता त्यांनी मंत्रिमंडळात लवकर फेरबदल होणार नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे मंत्री आनंद सिंह यांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नाराज असलेले आनंद सिंह यांनी शनिवारी जिंदाल विमानतळावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्वागत करण्यासा आले नव्हते. त्यामुळे ते अजूनही नरहज असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, बोम्माईने अल्माट्टी जलाशयाकडे जाताना जिंदाल विमानतळावर थांबले होते.
यावेळी बळ्ळारीचे आमदार सोमशेखर रेड्डी आणि जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मात्र मुख्यमंत्री बोम्माई यांचे स्वागत करत भेट घेतली आणि विमानतळावर प्रदेशाच्या विकासाबद्दल चर्चा केली. पण आनंद सिंह, ज्यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठकीलाही हजर नव्हते. तसेच त्यांनी काळी विमानतळावर हजेरी लावली नाही.
दरम्यान, राज्यात सुरु असणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेलाही ते उपस्थित नव्हते. सिंह गुरुवारी बल्लारी येथे केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेपासून दूर राहिले होते. जेव्हाही मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याला भेट देतात, प्रोटोकॉलनुसार, जिल्हा मंत्र्याला त्यांचे स्वागत करावे लागते. पण सत्ताधारी पक्षात सर्व काही ठीक नसल्याचा इशारा देऊन आनंद सिंह विमानतळावर आले नाहीत.
सिंह यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत केले, जेव्हा ते दोन दिवसांच्या हंपी आणि टीबी धरणाच्या भेटीसाठी होसापटे येथे आले होते. आनंदसिंह राज्याच्या नेतृत्वावर नाराज आहेत कारण त्यांना हवे असलेले मंत्रिपद दिले गेले नाही. बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या वारंवार केलेल्या प्रयत्नांमुळे सिंह यांना शांत करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे येत्या काळात सिंह काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.









