ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने सर्व मंत्रालये, सार्वजनिक विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सना भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (MTNL) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या सेवांचा वापर करणे अनिवार्य केले आहे.
दूरसंचार विभागाने यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारने BSNL आणि MTNLच्या सेवांचा सर्व मंत्रालये, सार्वजनिक विभाग, सीपीएसई, केंद्रीय स्वायत्त संस्थांनी वापर करणे बंधनकारक आहे. 12 ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक काढण्यात आले असून, अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून केंद्र सरकारच्या सर्व सचिवालये आणि विभागांना जारी करण्यात आले आहे.
त्यानुसार आता या सर्व सरकारी विभागांना इंटरनेट, ब्रॉडबँड, लँडलाईन आणि लीज लाईन अफेअर्ससाठी BSNL किंवा MTNL नेटवर्कचा वापर
करावा लागेल.









