मुंबई \ ऑनलाईन टीम
मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांची आज प्राणज्योत मालवली.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील मंचर गावातील सुभाष जाधव हे रहिवाशी होते. जमिनीच्या व्यवहारात सुभाष जाधव यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांत न्याय मिळवण्यासाठी धाव घेतली. मात्र स्थानिक पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. यामुळे ते अस्वस्थ होते. पण त्यांनी न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयात धाव घेतली. शुक्रवारी २० ऑगस्टला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले होते. मात्र सुभाष जाधव यांना मंत्रालयात प्रवेश नाकारला आणि त्यानंतर ते मंत्रालयाच्या गेटसमोरच विषारी कीटनाशके प्यायले. यामुळे ते जमिनीवर कोसळले. तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या ते नजरेस आले आणि त्यांना तातडीने जी.टी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दोन दिवसांच्या उपचारांनंतर सुभाष जाधव यांचा मृत्यू झाला.
सुभाष जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








