मंड्या/प्रतिनिधी
नागमंगला तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या बातमीनंतर तहसील इमारत तीन दिवस सील करण्यात आली. तसेच नागमंगला टाऊन पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलिस स्टेशन तीन दिवस सील केले आहे. यांनतर दोन्ही ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
अधिकारी मच्चेगौड़ा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मद्दूर तहसील पंचायत भवन येथे तहसीलदार विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूपासून बचावासंदर्भात बैठक झाली. बैठकीस संबंधितअधिकाऱ्यांसह तहसील पंचायत अध्यक्ष जयलक्ष्मी, उपाध्यक्ष रघु, तहसील पंचायत अधिकारी मुनिराज आदी उपस्थित होते.









