प्रतिनिधी/ बेळगाव :
हिरेबागेवाडी येथील गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मंजुनाथ भीमराव इळगेर यांचा स्थानिक सामाजिक आरोग्य केंद्राच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हॉस्पिटलच्या प्रशासकीय आरोग्याधिकारी डॉ. नीता चव्हाण, दंततज्ञ दीपा मगदूम व ज्ये÷ आरोग्य साहाय्यक एस. बी. मेळेद यांनी कोरोनाच्या काळात मंजुनाथ यांनी जे सामाजिक कार्य केले ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी मुख्य म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा केली नाही. रात्रंदिवस ते स्वेच्छेने गावकऱयांसाठी झटले आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करताना आनंद व्यक्त होत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आकाश दबास, शशिधर कडेमनी, वाणीश्री कोंकणी, अद्वैशप्पा सनदी, शिवानंद भुपण्णावर, रमेश रावळी, हणमंत तळवार, रमेश रोडबसण्णावर, गीता इळगेर आदी उपस्थित होते.









