मंगळूर/प्रतिनिधी
मंगळूर विमानतळ कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन प्रवाशांकडून १.०९ कोटी रुपयांचे २.१५ किलो सोने जप्त केला आहे.
अधिकाऱ्यांनी फैजल थोट्टी मेलपेरम्बा आणि केरळमधील कासारगोड येथील रहिवासी मोहम्मद शुहैब मुगु यांना अटक केली. दोघे एअर इंडियाच्या विमानाने शारजाहाहून आले होते. दरम्यान शोध घेत असताना दोन्ही प्रवाश्यांनी त्यांच्या कपड्याखाली रूपात सोनं लपवून ठेवलं होत.