मंगळूर/प्रतिनिधी
एका खासगी रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी मंगळूर पोलिसांनी बुधवारी दोघा आरोपींना अटक केली. शमशेर अली (वय ४३) आणि सरफराज अली (वय २७ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
२१ मे रोजी डॉ. जयप्रकाश रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी गेले असता आणि ते तेथून बाहेर पडत होते तेव्हा सुमारे २० ते २५ जणांच्या जमावाने त्यांच्यासोबत गैरवर्तन करुन त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांना कॉलरला धरुन त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांच्या कर्तव्य बजावण्यात अडथळा आणला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी काद्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.









