बेंगळूर : खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मोठय़ा नौकेला बोटीने धडक दिल्याने 12 मच्छीमार बेपत्ता झाले तर दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मंगळूरमध्ये घडली. इंडियन कोस्ट गार्डने यासंबंधीचे ट्वीट केले आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, केरळच्या कोझिकोड जिल्हय़ाच्या बेपूर येथून निघालेल्या मच्छीमारी बोटीला अपघात झाला. ही घटना मंगळूर बंदरापासून 42 नॉटीकल मैलावर घडली. खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीने मोठय़ा नौकेला धडक दिली. त्यामुळे ती उलटून बुडाली. सदर बोटीवर 14 जण होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उर्वरित 12 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.
बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाचे 3 आयसीजी बोटी आणि एअरक्रॉफ्टची मदत घेण्यात आहे. सदर बोटीवर तामिळनाडू आणि बंगालमधील कामगार होते.









