गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
राज्यात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून चोरटे काही महिलांना टार्गेट करुनच चोरी करीत असल्याचे उघडकीस आले असून त्यात प्रामुख्याने वयोवृद्ध महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्रे पळविण्याचा चोरटय़ांचा बेत असून यामागे इरानी गँग वावरत असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले आहे. गेल्या दोन वर्षाची सरासरी पाहता दिवसेंदिवस मंगळसूत्रे, सोनसाखळी पळविण्याच्याबाबतीत घट होण्याचे सोडून या प्रकरणात वाढ होत असल्याचे दिसून येते.
म्हापसा बाजारपेठेत व पोलीस स्थानकाच्या हद्दीत सीसीटीव्ही असून त्यामध्ये बिघाड झाल्याने अनेकवेळा पालिकेशी पत्रव्यवहार करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पोलीस वर्गाकडून बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे गँग पुणे येथील असून महाराष्ट्रात हे गँग सक्रिय आहे. तेथील पोलिसही त्यांना पकडू शकत नाही. प्रथम येऊन ते पाहणी करतात व मोटारसायकलचा हेल्मेटचा वापर करून मंगळसूत्र लंपास करीत असल्याचे आढळून आले आहे. या चोरटय़ांची मोडीस ऑपरेन्टी अन्य चोरापेक्षा वेगळी असून आज म्हापशात, उद्या हणजूण दोन दिवसानंतर जुने गोवे तेथून दक्षिण गोव्यात व नंतर हे चोरटे रेल्वे मार्गाने पसार होत असल्याचे आजवर झालेल्या चोरीच्या तपासात उघड झाले आहे. यात पुणे महाराष्ट्र येथील इरानी गँगचा शंभर टक्के समावेश असल्याची खात्री पोलीस वर्गांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चोरटय़ांना पकडणेही पोलिसांसमोर मोठे आव्हान बनून राहिले आहे.
या चोरटय़ांचा अज्ञात स्थळी महिलांना टार्गेट
अलीकडेच पोलीस महानिरीक्षक यांनी राज्यातील पोलीस हद्दीत होणाऱया चोऱयाबाबत खेद व्यक्त करीत आता सकाळी पहाटे ते दहा वाजेपर्यंत व सायं. 5 ते सायं. 8 वाजेपर्यंत काही मोजक्याच ठिकाणी राज्यातील काही गर्दीच्या ठिकाणी तर काही मोजक्याच ठिकाणी ग्रामीण भागात साध्या वेषातील पोलीस तैनात ठेवले आहेत. तसा आदेशही राज्यातील सर्व पोलीस स्थानकात देण्यात आला असला तरी सोनसाखळी लंपास होणाऱया संख्येत मात्र पूर्वीप्रमाणे आताही वाढ होत चालली आहे. चोरटय़ांना पकडण्यास पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी पोलिसांपेक्षा चोरटे हुषार झाल्याने चोरी कशी व कधी करावी याचा संपूर्ण अभ्यास करुनच पोलिसांच्या आड चोरटे आपली चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हे चोरटे अज्ञात स्थळी टार्गेट करुन महिलांना लुबाडतात. या चोरटय़ांचा मुख्य उद्देश सोनसाखळी वा मंगळसूत्र लंपास करणेच असतो आणि त्यात ते सफलही होतात असे असले तरी हे चोरटे बिगर गोमंतकीयच असल्याची पोलिसांनी ही माहिती दिली.
पंचायत क्षेत्रात संशयित भागात सीसीटीव्ही पॅमेरा बसविण्याचे आदेश
राज्यातील सर्व पंचायत क्षेत्रात असलेल्या काही ठिकाणी चोऱया होतात त्या ठिकाणी पंचायतीने पॅमेरा बसवावेत तसेच त्या ठिकाणाची सर्व माहिती स्थानिक पोलीस स्थानकात द्यावी असे परिपत्रक पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस स्थानकात काढले आहे. आठ दिवसापूर्वीच हे परिपत्रक काढले असून अद्याप कोणत्याच पंचायतीने याबाबत उत्तर दिले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. असे असले तरी यातील ज्या काही पंचायती आर्थिकदृष्टय़ा बळकट आहेत तेथेच हे पॅमेरे बसवू शकतात. मात्र काही ठिकाणी पंचायतीचे उत्पन्नच कमी असल्याने त्या ठिकाणाचे काय? असा प्रतिसवाल एका पोलीस अधिकाऱयांनी बोलताना केला.
म्हापशातील सीसीटीव्ही कमेरा शोभेच्या वस्तू
म्हापसा बाजारपेठेत तसेच गांधीचौक हुतात्मा चौक आदी मिळून सुमारे 9 सीसीटीव्ही पॅमेरा अस्तित्वात आहेत मात्र आज हे सर्व पॅमेरे शोभेची वस्तू बनून राहिले आहे. सर्व पॅमेरे नादुरुस्त असून यामुळे बाजारपेठेत वा आजूबाजूला होणाऱया चोरींचा छडा लावणे कठीण होऊन बसले आहे. पूर्वी हे पॅमेरे एक प्रसिद्ध कंपनीकडून खरेदी करण्यात आले मात्र वर्षभराच्या कालावधीनंतर या पॅमेरामध्ये बिघाड झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. म्हापसा नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून म्हापसा बाजारपेठ व भओवताल परिसरात सीसीटीव्ही पॅमेरे बसविले खरे मात्र आज ते फक्त शोभेची वस्तू बनून राहिले आहे.
पालिकेकडे पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष
दरम्यान याबाबत मिळालेल अधिक माहितीनुसार म्हापसा पोलीस स्थानकाच्या अधिकारी वर्गाकडून कीन वर्षापूर्वी क्लेन मदेरा मुख्याधिकारी असताना लेखी कागदोपत्री येथे पॅमेरा नादुरुस्त असून ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती कागदोपत्रीत राहिली. पोलिसांना चोरीचा छडा लावण्यास सीसीटीव्ही पॅमेरा महत्तवाचा दुव ाठरतो मात्र त्यांच्या या मागणीकडेच जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पोलीस अधिकारी वर्गांनी दै. तरुण भारतकडे बोलताना केला. दरम्यान मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी कबीर शिरगावकर हे मुख्याधिकारी म्हापशात आले त्यांच्या पर्यंतही म्हापशातील बिघाड झालेले पॅमेरे दुरुस्त करावेत अशी लेखी मागणी करण्यात आली. शिवाय अन्य ठिकाणीही पॅमेरे बसविण्याचीही मागणी म्हापसा पोलिसांकडून करण्यात आली मात्र ही मागणीही पालिकेत कागदपत्रीच पडून राहिलेली आहे.
सराफी दुकानदारांनी पॅमेरे बसविले
अलिकडेच म्हापसा बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी संघटना व दुकानदार यांची संयुक्त बैठक राज्याचे पोलीस महानिरीक्षकांसमवेत म्हापसा पोलीस झाली होती. त्यावेळी जे सराफी दुकानदार आहेत त्यांना आपापल्या दुकानासमोर सीसीटीव्ही बसविण्याचा आदेश पोलीस अधिकारी वर्गांनी दिला. त्यानुसार काहीनी आपल्या सराफी दुकानासमोर सीसीटीव्ही पॅमेरे बसविले असले तरी ते आपल्या शटरपर्यंतच लावलेले आहेत. त्यामुळे आजूबाजूला त्याचा काहीच उपयोग होत नाही. बाजारपेठेत असलेले अन्य पॅमेरे त्वरित दुरुस्त करणे काळाची गरज आहे अशी माहिती पोलीस वर्गांनी दिली.
चतुर्थीपूर्वी पॅमेरे दुरुस्ती केले होते
दरम्यान याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी मावळते नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चतुर्थीपूर्वी आम्ही काही सीसीटीव्ही पॅमेरे दुरुस्त केले होते. हे पॅमेरे म्हापसा पोलीस मोनिटर करतात मात्र त्या पॅमेरांची दुरुस्ती व मेंटनेन्स करावे लागते. आम्ही कनिष्ठ अभियंत्यांना सांगून या पॅमेरामध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. मात्र आता ते पुन्हा नादुरुस्त झाले असावेत असे ब्रागांझध म्हणाले. याबाबत आपण मुख्याधिकाऱयांशी बोलतो असे ते म्हणाले.
म्हापशात तेवढे पॅमेरे पालिकेला देणे शक्य नाही- मुख्याधिकारी कबीर शिरगांवकर
दरम्यान म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, म्हापसा बाजारपेठेतील सीसीटीव्ही पॅमेरा बसविणे पालिकेची जबाबदारी आहे. काही पॅमेरे नादुरुस्त आहेत हे मान्य आहे ते बदलणे आवश्यक आहे. म्हापसा पोलिसांनी आम्हाला लेखी पत्रव्यवहार करून म्हापशात सर्वत्र सीसीटीव्ही पॅमेरे पाहिजत्याची यादी आमच्याकडे सुपूर्द केली असली तरी तेवढे पॅमेरे बसविणे शक्य नाही. भविष्यात त्यावर विचार करू अशी माहिती मुख्याधिकारी शिरगावकर यांनी दिली.
महिलांना योग्यरीत्या सुरक्षा मिळत नाही- शुभांगी वायंगणकर
महिलांचे मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिक आहे मात्र आज वाढत्या महागाईत लॉकडाऊनमुळे काही व्यसनाच्या आहारी गेले आहे. मंगळसूत्र चोरी प्रमाणात वाढ होत चालली आहे. बेरोजगारीमुळे काहीच मिळत नसल्याने मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. महिला मंगळसूत्र घरी ठेऊ शकत नाही, महिलावर्ग आज भयभीत झालेली आहे. दिवसाढवळय़ा चोऱया होत आहे. महिलाबाबत कायदा असला तरी त्याची भीती कुणाला नाही कारण शासन यावर गंभीर नाही. महिलांना सुरक्षा मिळणे आज काळाची गरज आहे. असे भंडारी समाजाच्या महिला अध्यक्ष सुभांगी गुरुदास वायंगणकर म्हणाल्या.
प्रदर्शन करण्यापेक्षा सावधगिरी बाळगा- करुणा सातार्डेकर
आज राज्यात मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रकारात वाढ होत असली तरी महिलांनी मंगळसूत्रात प्रदर्शन करण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे आज काळाची गरज आहे. महिलांकडे दोन मंगळसूत्रे असतात एक मोछे व एक छोटे शक्यतो महिलांनी छोटय़ा मंगळसूत्र (डाऊल) चा वापर करणे आवश्यक आहे. सोनसाखळी वा मंगळसूत्र हिसकावल्याने गळय़ाला दुखापत होते. काहींना जीवही गमवावा लागला आहे. सायंकाळी वा सकाळी काहीजण मॉर्निंग वॉकला जातात त्यावेळी एकटे न जाता एकत्रित जाणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना टाळणे अधिक शक्य होईल. कारण चोरटे अशा महिलांवर पाळत ठेवून असतात. अशी प्रतिक्रिया जीव्हीएम डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालय फोंडाच्या सहाय्यक प्राध्यापिका करुणा राजेंद्र सातार्डेकर यांनी व्यक्त केली.









