प्रतिनिधी/ सातारा
येथील ऐतिहासिक अशा मंगळवार तळ्यात गेल्या दोन दिवसापासून ऑक्सिजन विना तडफड सुरू झाली आहे.कित्येक मासे मरून पाण्याच्या वर थर आला आहे.अशुद्ध पाणी झाल्याने हा प्रकार झाला आहे. तळ्यात अशुद्ध पाण्यामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सातारा शहरात इतिहास कालीन असे मंगळवार तळे आहे.त्या तळ्याची सातारा पालिका दर तीन वर्षांनी स्वच्छता केली जाते.या तळ्याच्या स्वच्छता करण्यासाठी प्राधान्याने नगरसेवक अविनाश कदम, हेमांगी जोशी हे दोघे लक्ष घालून काम करायचे.नगरसेवक वसंत लेवे यांचे ही लक्ष असते. पण या तळ्यात मासे गेल्या दोन दिवसांपासून मरु लागले आहेत.तळ्याची स्वच्छता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी केली आहे.









