सर्वाधिक रुग्ण बेळगाव शहर – तालुक्मयात
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांचा आकडा मंगळवारीही द्विशतकाने गाठला. जिल्हय़ात तब्बल 228 जण पॉझिटिव्ह सापडले तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव शहर आणि तालुक्मयामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून मंगळवारी शहर व तालुक्मयात 98 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मंगळवारी 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील भाग्यनगर, वीरभद्रनगर, कॅम्प, टिपूसुलताननगर-मच्छे, शहापूर, समर्थनगर, न्यूगांधीनगर, महांतेशनगर, उज्ज्वलनगर, संगमेश्वरनगर, रामदेव गल्ली- वडगाव, शिवबसवनगर, मराठा गल्ली, भोवी गल्ली, गणेशपूर, रामनगर, सदाशिवनगर, भाग्यनगर-वडगाव, टिळकवाडी, वडगाव, अयोध्यानगर, द्वारकानगर, विद्यानगर, बिम्स हॉस्पिटल, विनायकनगर, ताशिलदार गल्ली, माळी गल्ली, शेट्टी गल्ली, खडेबाजार, अंजनेयनगर, शिवाजीनगर, बागवान गल्ली, चव्हाट गल्ली, आळवण गल्ली, शाहूनगर या परिसरात मंगळवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
मंगळवारी अथणी, बैलहोंगल, सौंदत्ती, रायबाग-कुडची, बेळगाव, रायबाग येथील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 532 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 739 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
याचबरोबर ग्रामीण भागातील मच्छे, पिरनवाडीसह इतर गावांमध्येही रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी अथणीमध्ये मात्र 24 रुग्णांची भर पडली आहे. अथणीबरोबरच चिकोडी, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी, सौंदत्ती, रायबाग, खानापूर तालुक्मयामध्ये रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तेव्हा जनतेने काळजी घेणे गरजेचे बनले आहे. सध्या विविध असोसिएशन, दुकाने व इतर आस्थापने काही वेळ बंद करण्याचे ठरविले आहे. सराफ असोसिएशन सायंकाळी पाचनंतर तर पेंटस् असोसिएशनने दुकाने दुपारपासूनच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरण्यापेक्षा प्रत्येकाने घरात राहणे योग्य ठरणार आहे. तोंडाला मास्क तसेच सोशल डिस्टन्स पाळणेही महत्त्वाचे आहे.









