देशासह जगातील बाजारातील अस्थिर वातावरणाचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी देशातील आणि जागतिक शेअर बाजारातील कोणतेही निश्चित संकेत नसल्याच्या अभावामुळे बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही प्रमाणात घसरण राहिल्याची नोंद करत बाजार बंद झाले आहेत. मोठी काही घसरण झाली नसल्याचा दिलासा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.
मंगळवारी शेअर बाजाराने सकारात्मक सुरूवात केली होती. प्रारंभीच्या काळात बाजारातील व्यवहार हा 254 अंकांनी वाढून दिवसअखेरीस मात्र 8.41 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,973.22 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5.15 अंकांनी घसरुन 11,222.40 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर सर्वाधिक तीन टक्क्मयांची घसरण ही ओएनजीसीची राहिली असून सोबत इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, ऍक्सिस बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी आणि आयटीसीमध्येही घसरण राहिली आहे. दुसऱया बाजूला अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, टाटा स्टील, टायटन आणि एचडीएफसीचे समभाग तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहेत.
शेअरबाजारांमधील व्यवहारामुळे देशातील आणि जागतिक बाजारांचे स्पष्ट संकेत न मिळाल्याने शेअर बाजार घसरणीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण बैठक लांबणीवर टाकण्यात आल्याने याचेही पडसाद बाजारावर होते. गुंतवणूकदार मंगळवारी सावध राहिले होते. यासह जगातील अन्य बाजारांतील व्यवहारावर अमेरिकेत होणाऱया राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा कालावधी जवळ येत असल्याचेही पडसाद शेअर बाजारांवर राहिले आहेत.
प्रमुख बाजारात शांघाय, टोकीओ आणि सियोलचे बाजार तेजीसह बंद झाले आहेत. तसेच हाँगकाँगचा बाजार घसरला आहे. युरोपातील शेअरबाजार प्रारंभीच्या काळातच घसरणीत राहिला आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क क्रूड 0.44 टक्क्यांच्या घसरणीसह 42.68 अमेरिकी डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.








