जिल्हय़ात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद, तालुक्मयातील 540 जणांचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव जिल्हय़ामध्ये कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद झाली आहे. तब्बल 1320 जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 540 जणांचा समावेश आहे. इतक्मया मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. वेळीच खबरदारी घेतली नाही तर भविष्यात मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मंगळवारी तिघा जणांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत जिल्हय़ात एकूण 365 जण दगावले आहेत.
मंगळवारी तालुक्मयातील ग्रामीण भागात 153 तर शहरी भागात 387 जण कोरोना बाधित आढळले आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात आकडेवारी वाढत असल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर समस्येला तेंड द्यावे लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मंगळवारी शहरातील हनुमाननगर, अनगोळ, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, जाधवनगर, जैनबस्ती, केएचपी कॉलनी, कडोलकर गल्ली, कलमेश्वर गल्ली-वडगाव, कामत गल्ली, कणबर्गी, कपिलेश्वर कॉलनी, कावेरीनगर, केशवनगर, खडेबजार-शहापूर, केएलई कॉलेज, केएलई हॉस्पिटल, कोनवाळ गल्ली, कोरे गल्ली-शहापूर, कुमार स्वामी लेआऊट, टिचर्स कॉलनी, महाद्वार रोड, महांतेशनगर, महात्मा फुले रोड, मजगाव, माळी गल्ली, मंडोळी रोड, मार्केटयार्ड, शहापूर, मृत्यूंजयनगर, सदाशिवनगर, रुक्मिणीनगर, राणी चन्नम्मानगर, आनंदनगर-वडगाव, शाहूनगर, खासबाग, संगमेश्वरनगर, टिळकवाडी, ताशिलदार गल्ली, टी. व्ही. सेंटर, उद्यमबाग-अनगोळ, विश्वेश्वरय्यानगर ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर नानावाडी, जुने गांधीनगर, रामतीर्थनगर, चव्हाट गल्ली, चिदंबरनगर, क्लब रोड, दत्तात्रय गल्ली-वडगाव, द्वारकानगर, गुरुप्रसाद कॉलनी, गणेशनगर, शिवबसवनगर, शाहूनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, शिंदी कॉलनी, वीरभद्रनगर, वैभवनगर, वडगाव-बेळगाव, विद्यानगर, यमनापूर यासह एटीएमस सांबरा, शिंदोळी, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द, अलतगा, काकती, खादरवाडी, नंदिहळ्ळी, हिरेबागेवाडी, उचगाव, हलगीमर्डी, गणेशपूर, यासह इतर भागांमध्ये रुग्ण आढळले आहेत.









