प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे जिल्हय़ाला दिलासा मिळत आहे. मंगळवारी 466 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 201 जणांचा समावेश आहे. रुग्णसंख्या घटत असल्यामुळे दिलासा मिळत आहे. तरी देखील जनतेने अजूनही कोरोनाचे नियम पाळून कोरोना पूर्णपणे थोपविणे गरजेचे आहे.
मंगळवारी 466 रुग्ण आढळले असले तरी 1180 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना विविध इस्पितळ व कोविड केअर सेंटरमधून घरी पाठविण्यात आले आहे. तर कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 655 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या 8 हजार 864 सक्रिय रुग्ण आहेत. बेळगाव जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 71 हजार 476 कोरोना बाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 61 हजार 957 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याची आकडेवारी वाढली आहे. त्यामुळे सध्या तरी दिलासा मिळाला आहे.
नागरिकांनी अजूनही सावध रहावे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला म्हणून कोणीही बेजबाबदारपणे वागू नये. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. ही बाब दिलासादायक आहे. असे असले तरी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
दुसऱया लाटेमध्ये कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण उच्चांकी झाले. त्यामुळे सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनही अक्षरशः हतबल झाले. रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे भीती निर्माण झाली होती. आता हे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी अजूनही जागरूक राहून प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी शहरामध्ये 131 तर ग्रामीण भागामध्ये 70 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भाग्यनगर, बसवाण गल्ली-बेळगाव, बाजार गल्ली-खासबाग, भोवी गल्ली, बिच्चू गल्ली-शहापूर, चव्हाट गल्ली, गणेशपूर-हिंडलगा, गोडसेवाडी, रामतीर्थनगर, टिळकवाडी, इंडाल, जाधवनगर, कणबर्गी, उद्यमबाग, लक्ष्मीनगर-वडगाव, मजगाव, महांतेशनगर, मल्लिकार्जुननगर, अमाननगर, मुत्यानट्टी, शहापूर, नयानगर, नेहरुनगर, न्यूगांधीनगर, देवराजअर्स कॉलनी, पार्वतीनगर, श्रीनगर, रामतीर्थनगर, शाहूनगर, राणी चन्नम्मानगर, रामनगर, श्रीनगर, शास्त्राrनगर, सुभाषनगर, वंटमुरी, हनुमाननगर या परिसरात रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील काकती, बी. के. कंग्राळी, बस्सापूर, बसरीकट्टी, बिरनगड्डी, गौंडवाड, पिरनवाडी, हिरेबागेवाडी, हिंडलगा, के. के. कोप्प, होनीहाळ, देवगिरी, यळेबैल, बोडकेनहट्टी, गुंजेनहट्टी, नागिरहाळ, बडस, सांबरा, कंग्राळी के. एच., पंतबाळेकुंद्री, शिंदोळी, सुळगा, सुळेभावी, गोजगा, जाफरवाडी, उचगाव, पणगुत्ती, हुदली, मुतगा, मोदगा, मण्णूर या गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत.
विनाकारण फिरणाऱयांची 45 वाहने जप्त
कोरोना काळात विनाकारण फिरणाऱयांची 45 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर विनामास्क फिरणाऱया 263 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच केईडी कायद्यांतर्गत एका दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली आहे.









