1 हजार 68 नवे रुग्ण, तालुक्यातील 412 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना बाधितांची संख्या दररोज हजारच्या पट्टीतच वाढत आहे. मंगळवारी जिल्हय़ामध्ये कोरोनाच्या संख्येने हजारचा टप्पा पार केला आहे. 1 हजार 68 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये तालुक्मयातील 412 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. तेव्हा आता प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बेळगाव शहर व उपनगरांत एकूण 341 कोरोना रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागामध्ये 71 रुग्ण आढळून आले आहेत. शहरामध्ये हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे असले तरी अजूनही याबाबत गांभीर्य घेण्यास सर्वसामान्य जनता तयार नाही. बाजारपेठेत गर्दी होत आहे. याचबरोबर बरेच जण विनामास्क फिरताना दिसत आहेत. परिणामी रुग्णसंख्या वाढत चालली असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे.
मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. दररोज 1 ते 5 या संख्येत रुग्ण आढळत होते. मात्र आता गेल्या 15 दिवसांत रुग्णसंख्या आढळण्याचा आलेख वाढतच चालला आहे. हा आकडा आता 1 हजारांवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनाही यावेळी कोरोनाची लागण झाली आहे.
मंगळवारी अंजनेयनगर, अशोकनगर, ऑटोनगर, आझादनगर, आझमनगर, बसव कॉलनी, बसवण कुडची, वडगाव, कॅम्प, रुक्मिणीनगर, टिळकवाडी, आदर्शनगर, अमननगर, अनगोळ, भाग्यनगर, भांदूर गल्ली-बेळगाव, भारतनगर-शहापूर, बिम्स कॅम्पस, सदाशिवनगर, गांधीनगर, रामतीर्थनगर, हनुमाननगर, चन्नम्मानगर, चिदंबरनगर, क्लब रोड, कुवेंपूनगर, महाद्वार रोड, महालक्ष्मीनगर, महांतेशनगर, माळमारुती, मार्कंडेयनगर, शहापूर, मुजावर गल्ली-बेळगाव, हिंदवाडी, शिवबसवनगर, गुरुप्रसादनगर, जेएनएमसी कॅम्पस, कपिलेश्वर रोड, कणबर्गी आदी ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
न्यू गांधीनगर, शास्त्राrनगर, शाहूनगर, श्रीनगर, टी. व्ही. सेंटर, विद्यानगर, वंटमुरी कॉलनी, यमनापूर याचबरोबर ग्रामीण भागातील एटीएस सांबरा, बी. के. कंग्राळी, गौंडवाड, हिरेबागेवाडी, काकती, बडस, मुत्नाळ, हलगीमर्डी, हालभांवी, हलगा, मारिहाळ, हुदली, तुरमुरी, के. के. कोप्प, कडोली, अगसगे, मच्छे, धामणे, येळ्ळूर, पंतबाळेकुंद्री, पिरनवाडी, उचगाव, निलजी यासह इतर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.









