प्रतिनिधी/ सातारा
ssजिल्हा परिषदेची मंगळवारी ऑफलाईन सर्वसाधारण सभेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या आग्रहाखातर स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे. या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य स्वच्छता, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण विभागावर ताशेरे निघणार असून सदस्यांनी सर्व तयारी केली आहे. तसेच अपलोड घोटाळयावरुन आरोग्य विभागाला सदस्य जाब विचारणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सोमवारी दुपारी मोजक्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत् आहे. मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची पार्टी मिटींग होणार आहे.
कोरोनाच्या कार्यकाळात प्रत्यक्ष सभा घेता येत नव्हती. तसा नियम असल्याने सुरुवातीला ऑनलाईन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे निमंत्रण जिल्हा परिषद सदस्यांना पाठवण्यात आले. मात्र, सदस्यांनी ऑनलाईन सभेत बोलता येत नाही. प्रश्न मांडता येत नाही त्याकरता ऑफलाईन सभा घेण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे केली. त्यानुसार उदय कब्gाले यांनी मंगळवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात ऑफलाईन घेतली आहे. त्या सभेत बांधकाम विभागाकडून सध्या कामांचा जोर वाढवला असला तरीही काही ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगाने सदस्य प्रश्न मांडणार आहेत. शिक्षण विभागात अनेक शिक्षकांची सेवा पुस्तकावर सेवानिश्चितीचा प्रश्न तसाच गटशिक्षणाधिकाऱयांच्या आडमुठय़ा भुमिकेमुळे थांबला गेला आहे. कोरोनाच्या काळात त्यांना वेतन मिळावे ही मागणी होत असताना अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यासह शिक्षण विभागाच्या अनेक प्रश्नांवरुन शिक्षण विभागावर निशाणा साधला जाणार आहे. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या कारनाम्यांची जंत्रीच सदस्यांकडे आहे. त्यामुळे सदस्यांकडून कधीही मुद्दा उपस्थित सभेत होवू शकतो. दरम्यान, कोरोनाच्या काळात प्रशासन चांगले काम करत असले तरीही बाधितांचे आकडे चुकीच्या पद्धतीने अपलोड केले गेल्याने जिह्यावर लॉकडाऊन लादला गेल्याचे तरुण भारतने उघडकीस आणले गेले आहे. त्या प्रकरणावरुनही ऑफलाईन सभेत सदस्य याचा जाब विचारणार आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मोजक्या सदस्यांची बैठक सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत या सभेमध्ये कोणत्या खात्यास कोंडीत पडकायचे हे ठरणार आहे. तसेच पार्टी मिटींग मंगळवारी सकाळी होणार असून त्यावेळी आक्रमकपणे पुढे पुढे बोलणाऱया राष्ट्रवादीच्या सदस्यांना सुचना दिल्या जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.









