प्रतिनिधी / सांगली
शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगली ते तुळजापूर मंगल कलश मोटारसायकल यात्रेस शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.शिवतीर्थ परिसरातील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवसैनिक तुळजापुराकडे रवाना झाले. सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेला जलाभिषेक करुन आशिर्वाद मागण्यासाठी ही यात्रा काढण्यात येते शनिवारी सकाळी माजी उप शहर प्रमुख हरिदास पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवपुतळयापासून कृष्णा नदीच्या पाण्याच्या कलशाचे विधीवत पूजन करून या यात्रेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज, पै. राहुल पवार यांच्या हस्ते यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले, शहर प्रमुख महेंद्र चंडाळे, निमंत्रक हरिदास पडळकर, हरिदास लेंगरे, अमोल पाटील, प्रसाद रिसवडे, माजी नगरसेवक हरिदास पाटील, रविंद्र सावंत, तानाजी जाधव, सतिश सूर्यवंशी, धुंडप्पा माळी विजय गडदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या यात्रेत सुमारे ५० मोटरसायकली व १०० शिवसैनिक सहभागी झाले आहेत.








