आरोग्य विभाग मृत्यूच्या कारणांची तपासणी करणार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
एका 22 वर्षीय युवकाचा केरळमधील एका खासगी रुग्णालयात कथित स्वरुपात मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी अलिकडेच संयुक्त अरब अमिरातमधून परतलेल्या एका 22 वर्षीय युवकाच्या मृत्यूचे कारण जाणून घेतले जाणार असल्याचे रविवारी सांगितले आहे. तर आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये 8 वर्षीय मुलामध्ये मंकीपॉक्सची संशयास्पद लक्षणे दिसून आली आहेत. रुग्णाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ वायरोलॉजीमध्ये पाठविण्यात आले आहेत. तर रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.









