वृत्तसंस्था/ लिव्हरपूल
मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबने एफए चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. शनिवारी येथे झालेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने एव्हर्टनचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
शनिवारच्या सामन्यात मँचेस्टर सिटी क्लबतर्फे गनडोगेन आणि केव्हिन डी ब्रुनी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. गनडोगेनने 84 व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीचे खाते उघडले तर 90 व्या मिनिटाला ब्रुनीने दुसरा गोल नोंदवून एव्हर्टनचे आव्हान संपुष्टात आणले. साऊदम्पटनने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना बोर्नमाऊथचा 3-0 असा पराभव केला आहे.









