वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या सामन्यात क्रिस्टल पॅलेसने मँचेस्टर युनायटेडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील अन्य सामन्यात अर्सेनलने वेस्टहॅम युनायटेडचा तर एर्व्हटनने वेस्ट ब्रोमिच अल्बियानचा पराभव केला.
या स्पर्धेत तिसऱयांदा मँचेस्टर युनायटेड संघाला हंगामाच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात क्रिस्टल पॅलेसतर्फे ऍड्रोंस टाऊनसेंडने पहिला गोल तर विल्प्रेड झाहाने 74 व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवरून दुसरा गोल तर झाहाने संघाचा तिसरा आणि वैयक्तिक गोल करून मँचेस्टर युनायटेडचे आव्हान संपुष्टात आणले. मँचेस्टर युनायटेडतर्फे एकमेव गोल डॉनी व्हँन डी बिकने केला.
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात अर्सेनलने वेस्टहॅम युनायटेडचा 2-1 असा पराभव केला. वेस्टहॅमचा हा सलग या स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. एव्हर्टनने अन्य एका सामन्यात वेस्ट ब्रोमिचचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात एव्हर्टनतर्फे लेव्हिनने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.









