न्यू कॅसल
बेंचमधून मैदानावर उतरत निर्णायक गोल करणाऱया एडिसन काव्हानीच्या अव्वल खेळामुळे मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत न्यू कॅसल युनायटेडला 1-1 बरोबरीत रोखले. या लढतीत न्यू कॅसलने सातव्या मिनिटालाच ऍलंट सेंट-मॅक्झिमिनच्या जबरदस्त गोलमुळे आघाडी मिळवली होती. सीन लाँगस्टार्फच्या थ्रेडेड पासवर मॅक्झिमिनने इन साईडमधील दोन डिफेंडर्सना चकवा देत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. दुसऱया सत्रात मात्र त्याचा फटका मार्टिनने हवेत झेपावून परतावला होता. 20 मिनिटांचा खेळ बाकी असताना काव्हानीने बरोबरीचा गोल नोंदवला आणि निर्धारित वेळेअखेर ही लढत 1-1 फरकाने बरोबरीत राहिली.









