ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी स्युकुरो मानबे, क्लाऊस हॅसेलमन आणि जॉर्जिओ पॅरिसी यांना भौतिकशास्त्रासाठी 2021 चा नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. हवामान आणि गुंतागुंतीच्या भौतिक व्यवस्था समजून घेण्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल या तिघांची नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मानबे यांनी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची वाढती पातळी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान कसे वाढवते हे स्पष्ट केले. त्यांच्या कार्याने सध्याच्या हवामान मॉडेलच्या विकासाचा पाया घातला गेला. दरम्यान, मागील वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकन शास्त्रज्ञ आंदेया गेझ, ब्रिटनचे रॉजर पेनरोज आणि जर्मनीचे रेनार्ड गेन्झेल यांना देण्यात आले होते. कृष्णविवरांवर संशोधन केल्याबद्दल या तिघांचा नोबेलने गौरविण्यात आले होते.