ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अँड्रिया घेझ यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सचे सचिव जनरल होरान हॅनसन यांनी पुरस्काराची घोषणा केली.
सुवर्ण पदक आणि 11 लाख डॉलरहून अधिक रक्कम पुरस्कार स्वरुपात दिली जाणार आहे. या पुरस्काराची अर्धी रक्कम पेनरोझ यांना दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम रेनहार्ड आणि अँड्रिया यांना देण्यात येणार आहे.
रॉजर पेनरोझ यांनी सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताच्या साहाय्याने कृष्णविवराच्या निर्मितीचे भविष्य वर्तवता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. गेंजेल आणि गेज यांनी आकाशगंगेचे रहस्य उलगडून दाखवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.









