वार्ताहर/ भोसरे
येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या उपस्थितीत व विविध विभागाचे आधिकीरी स्वातंत्र्यसैनिक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भोसरे (ता. खटाव) येथील भोसरेचे सरपंच नितीन जाधव, ग्रामसेवक डी. बी. गावडे, माजी सरपंच महादेव जाधव, माजी व्हा. चेअरमन भीमराव जाधव, वनिता कनवाळू यांच्या उपस्थित पालकमंञी बाळासाहेब पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ देऊन सन्मान करण्यात आला.









