ऑनलाईन टीम / भोपाळ :
मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण झालेले खंडवा येथील भाजपचे खासदार नंदकुमार चौहान यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील त्यांची भेट घेतली.
दरम्यान, नंदकुमार चौहान याचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मात्र, त्यांच्या तब्येतमध्ये अजूनही सुधार होताना दिसत नाही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार चौहान यांची गंभीर आणि नाजूक स्थिती पाहता त्यांना एअर ऍम्ब्युलन्सद्वारे दिल्लीमध्ये नेले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. नुकतेच एम्स मधील डॉक्टरांच्या टीमने नंदकुमार चौहान यांच्या प्रकृतीचे परीक्षण देखील केले होते.









