नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्हय़ात भारताच्या भूसेनेचे एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याने त्याच्या दोन्ही वैमानिक मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरचे उड्डाण झाल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे ते तातडीने उतरविण्यात आले. या प्रयत्नात दोन्ही वैमानिक जखमी झाले. नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज रजपूत अशी वैमानिकांची नावे आहेत.









