‘तुम्ही आम्ही सगळे सत्तरीकार’तर्फे मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी / वाळपई
भूमीपुत्र विधेयक सत्तरी तालुक्मयासाठी फायद्याचे आहे. तरीसुद्धा या विधेयकामध्ये अनेक प्रकारच्या सूचना करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा व विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे रविवारी 29 रोजी चलो वाळपई नारा देण्यात आला असून सूचनावजा चर्चा मेळाव्याचे आयोजन सकाळी 10 वा.काणेकर सभागृहात करण्यात आलेले आहे.
सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या भूमीपुत्र अधिकारिणी विधेयकासंदर्भात सत्तरी तालुक्मयामध्ये संभ्रमावस्था आहे. सतरीसाठी हे विधेयक अत्यंत फायदेशीर आहे. कारण गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत अनेक घरांना क्रमांक दिलेले आहेत. मात्र त्यांना सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. अशा शेकडो जणांना घराचा अधिकार प्राप्त होणार आहे. त्यांना लेखी स्वरूपात सनद प्राप्त होणार आहे.
विधेयकावरून सत्तरीत गैरसमज
काही जण राजकीय हेतूपोटी या विधेयकासंदर्भात विरोध करताना दिसत आहे. मात्र या संदर्भाची माहिती भलतीच आहे. रविवारी होणाऱया मेळाव्यात या विधेयकासंदर्भात सविस्तरपणे माहिती देण्यात येणार आहे. यामुळे या मेळाव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात भूमिपुत्रांनी सहभागी व्हावे, अशा प्रकारचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
भूमीपुत्रांच्या मोर्चामुळे विधेयकाला महत्त्व
गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकी प्रश्नासंदर्भात गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. आतापर्यंत वेगवेगळय़ा स्तरावर आंदोलने उभी करून हा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी या भागातील भूमिपुत्र करीत आहेत. 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मोर्चात मोठय़ा प्रमाणात सहभागी होऊन भूमिपुत्रांनी सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न निकालात काढा, अशी आग्रही मागणी केली होती. यामुळेच सरकारने सदर विधेयकाची निर्मिती केली व यामध्ये सत्तरी तालुक्मयातील घर मालकांना जमिनीत अधिकार प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
घरांना मिळणार सनद
शेकडो घरांना फक्त क्रमांक प्राप्त झाला होता मात्र अनेक प्रकारच्या सुविधा त्यांना अजून पर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत.याविधेयकाच्या माध्यमातून त्यांना घर जमिनीची मालकी प्राप्त होणार आहे .यामुळे शेकडो नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मालकीहक्क प्राप्त होणार असल्याचे राजेश गावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ऍड. गणपत गावकर यांनी यावेळी सत्तरी तालुक्मयातील भूमिपुत्रांना हाक देताना मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहा व याविधेयकासंदर्भात चर्चेमध्ये भाग घ्या, असे आवाहन केले आहे. यासाठी चलो वाळपई असा नाया देण्यात आला आहे. सर्वसामान्य घटकांच्या भवितव्यासाठी या मेळाव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हा असे आवाहन गणपत गावकर यांनी केले आहे.









