ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी 151 नद्या, 8 मोठ्या नद्या आणि तीन समुद्राचे पाणी घेऊन दोन भाऊ अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांनी भूमिपूजनासाठी श्रीलंकेतील 16 ठिकाणाहून माती गोळा केली आहे.
राधेश्याम पांडे म्हणतात, 1968 पासून आम्ही हे कार्य करत आहे. विविध नद्यांच्या पाण्याचा आणि मातीचा उपयोग भूमिपूजनवेळी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आम्ही हे जल आणि माती घेऊन अयोध्येत दाखल झालो आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाला देशभरातील सिद्ध व शक्ती पीठांची माती व नद्यांचे पवित्र जल अयोध्येत पोहचविले जात आहे.