प्रतिनिधी/गगनबावडा
सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गगनबावड्याहून सिंधूदूर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याकडे जाताना सोयीचा ठरलेल्या भूईबावडा घाटरस्त्याला मध्यभागी भेग पडलेली आहे.रिंगेवाडी व गगनबावडा दरम्यान घाटमार्गावर हा रस्ता खचला तर येथे जिवित व वित्तहानी होणार आहे. अतिपावसाच्या काळात या मार्गाचा संपर्क तुटणार आहे. गेल्या दोन दिवसांत या रस्त्यावर तटबंदी कठडे, दरडी कोसळलेल्या आहेत. रस्त्याला भेग पडल्याने आणखी धोका वाढला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक कार्यवाही करुन हा मार्ग वाहतुकीस खुला करावा अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.
Previous Articleजिह्यात 3300 मेट्रिक टन युरिया दाखल
Next Article रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार धान्य








