भुये/प्रतिनिधी
भुये, ता. करवीर येथे क्रांतिकारक क्रिडा मंडळातर्फे ग्रामीणस्तरीय क्रांतिकारक फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी युवासेना राज्यविस्तारक हर्षल सुर्वे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी क्रांतिकारक क्रिडा मंडळ हे गेल्या 25 वर्षापासून नेहमीच अग्रेसर असते. या लीगमध्ये भुये, भुयेवाडी, जठारवाडी आदी गावांमधील एकूण 5 संघाने सहभाग घेतला असून भैरोबा माळ येथील मैदानावरती या स्पर्धा सुरु राहणार आहेत. स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी (दि.27) सायंकाळी 4.00 वा. होणार आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून राहूल चौगले (निगवे) तसेच फुटबॉल संघासाठी विकास पाटील, अमर मिसाळ, अमर शिंदे, विशाल पाटील, डॉ. संभाजी पाटील आदींचे सहकार्य आहे.
ग्रामीण भागामध्ये दर्जेदार प्रकारचे फुटबॉल खेळाडू निर्माण व्हावे यासाठी मंडळाचे प्रणव पाटील, राकेश पाटील, उद्धव पाटील, योगेश पाटील, प्रतिकराज पाटील आदीं परिश्रम घेत आहेत. तसेच सामने यशस्वीरित्या पार पडावे म्हणून भैरोबा क्रशर, श्रीदत्त क्रशर, गुरुमाऊली एजन्सी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, अमित देशमुख (पोलिस उपनिरीक्षक), भुयेचे सरपंच रमेश कांबळे, निवास तळेकर, बाजीराव पाटील, अमर पाटील रामचंद्र पाटील, संजय पाटील, सर्जेराव पाटील,भानुदास पाटील, संत ज्ञानेश्वर माऊली दुध संस्थेचे चेअरमन अरुण पाटील व परिसरातील नागरिक, क्रिडा शौकिन उपस्थित होते.