पिंपळगाव /वार्ताहर
भाजपच्या भुदरगड तालुकाध्यक्षपदी डॉ.विनायक परुळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके होते. तर, सरचिटणीस व गोकुळचे संचालक बाबा देसाई यांनी मार्गदर्शन केले.
पशुवैद्यकीय सेवक असलेले विनायक परुळेकर यांनी यापूर्वी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तसेच विधानसभा विस्तारक म्हणून काम केले आहे. यावेळी मावळते तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रत्येक तीन वर्षांनी भाजप पदाधिकारी निवडी करण्याची प्रथा असून त्यानुसार ही निवड झाली असल्याचे सांगत नुतन अध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांचेकडे पदभार सुपूर्द केला.
यावेळी अलकेश कांदळकर, योगेश परुळेकर, गारगोटी शहराध्यक्ष राहुल चौगले, नामदेव चौगुले,संतोष पाटील,गणपतराव शेटके, सुनील तेली, आदी कार्यकर्ते व बूथ प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहून पक्ष वाढीसाठी काम करत राहणार असल्याचे डॉ. परूळेकर यांनी सांगीतले.