गारगोटी / प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील पाल घाटातील टेम्पो अडवून केलेल्या चोरीचा छडा लावण्यात भुदरगड पोलिसांना १४ तासात यश आले. या प्रकरणात चक्क फिर्यादीच आरोपी असल्याचे उघडकीस आल्यान एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
तालुक्यातील गारगोटी गडहिंग्लज मार्गावर पाल घाटात रविवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञातांनी एक टेम्पोवर अंडी मारून तो अडविला होता. यानंतर चालक व त्याच्या सहकाऱ्यांस मारहाण करून त्यांच्याकडील इचलकरंजीतील बालाजी बेकरी व्यवसायातील ६७ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. दरम्यान या चोरीबाबत भुदरगड पोलिसात टेम्पोचालक किरण सुभाष पाटील रा. इचलकरंजी यांनी फिर्याद दिली होती. तात्काळ तपासात पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादीच्याच दिशेन वळली फिर्यादिस पोलिसी खाक्या दाखवला असता फिर्यादीचाच चोरीत सहभाग असल्याच उघडकीस आले.
या नंतर त्याच्या सोबत असलेल्या संतोष मारुती पाटील, अमोल रमेश रेडेकर, संजय बापूसो तारदाळे रा. नादिवेस, गावभाग, इचलकरंजी या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात नादिवेस, गावभाग इचलकरंजी इथल काही गुन्हेगार सामील असण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फिर्यादीच आरोपी निघाल्याने एकच खळबळ उडाली असून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, सतीश मयेकर,सतिश पाटील, तुकाराम सुर्यवंशी, भुदरगड पोलीस अधिक तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









