प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या आक्काताई प्रविणसिंह नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अश्विनी आडसुळ होत्या.यावेळी गटविकास अधिकारी एस जी पोवार उपस्थित होत्या.
पंचायत समितीवर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांची सत्ता आहे विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाचा प्रत्येकी एक असे तीन उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी भाजपाच्या आक्काताई प्रविण नलवडे मिणचे गणातून निवडून आल्या होत्या.कालच सौ.नलवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
निवड सभेस उपसभापती सुनिल निंबाळकर, माजी सभापती श्रीमती किर्ती देसाई , सौ.स्नेहल परीट, सौ.सरिता वरंडेकर, अजित देसाई, तर विरोधी सदस्य संग्रामसिंह देसाई, गायत्री भोपळे उपस्थित होते.
निवडीनंतर नलवडे यांचा सत्कार प्रशासनाच्यावतीने करण्यात आला. नलवडे यांच्या निवडीनंतर नलवडे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिशबाजी करून जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहीणी आबीटकर, गोकुळचे संचालकनंदकुमार ढेंगे, प्राचार्य अर्जुन आबीटकर, बाबा नांदेकर, कल्याणराव निकम, बी.एस देसाई, धैर्यशील भोसले सरकार, अजित जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.









