गारगोटी : प्रतिनिधी
तांबाळे शिवडाव राज्यमार्गावर साखर कारखाना फाट्यानजीक रस्त्यात विखुरलेल्या खडीवरून घसरून मोटरसायकल व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात शिवडाव इथल्या एकाचा मृत्यु झाला असुन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शिवाजी राजाराम तोरस्कर वय 3८ असे मृताचे नाव आहे. या अपघाताची नोंद भुदरगड पोलीसात झाली आहे. दरम्यान रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळे शिवाजी तोरस्कर यास जीव गमवावा लागला असुन संबधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
तालुक्यातील पाटगाव इथून उसाने भरलेला ट्रक एमएच 04 पी. 7764 हा तांबाळे कारखान्याकड गाळपासाठी जात होता. तांबाळे इथला रविवारी आठवडी बाजार असल्यामुळ शिवाजी तोरस्कर व त्याचा मुलगा राकेश बाजार करून दुचाकीवर एमएच-09 एफके 1591वरून आपल्या शिवडाव गावी जात होते. यावेळी कारखाना फाट्यानजीक ऊसान भरलेला ट्रक व मोटसायकल यांच्यात अपघात झाला. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्त्याची खडी सर्वत्र विखुरलेली आहे. ट्रक चुकीच्या बाजुने जात असतांना खडीवरून मोटसायकल घसरून पाठीमागील चाकात अपघात झाला.
मोटरसायकलस्वार पाठीमागील चाकात सापडला गेल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. यावेळी मृताचा मुलगा राकेश गंभीर जखमी झाला. या बाबतची फिर्याद नरेश तोरस्कर यांनी पोलीसात दिली असुन पोलीसानी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.गारगोटी – शिवडाव रस्त्याच काम सुरु असल्यान रस्त्याच्या कामाची खडी सर्वत्र विखुरलेली आहे. खडीवरून मोटसायकल घसरल्याने शिवाजी तोरस्कर यास जीव गमवावा लागला असून सबंधीत ठेकेदारान रस्त्याच काम अपूर्ण केल्यामुळ हा अपघात झाला आहे. त्यामुळ सबंधीत ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









