प्रतिनिधी/करडवाडी
कोरोना (कोविड19) च्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे 1एप्रिल ते 3 एप्रिल तारखेपर्यत कडकडीत बंद पुकारला आहे. या तीन दिवसात गावातील सर्व दुकाने, गिरणी, भाजीपाला, शेतीची कामे, तसेच टू व्हीलर मोटर सायकल रस्त्यांवर दिसलेस सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व फोटो मारून पोलिस स्टेशन येथे कळवले जाईल. गावातील सर्वच व्यवहार 100% बंद राहतील.
या काळात फक्त आरोग्य सेवा व 3 दिवस दुध डेअरी चालू राहतील. तसेच कोणीही घराबाहेर पडणेचे नाही, गल्लीत, चौकात जमावबंदी चर्चा करीत कोणीही बसायचे नाही. तसे कोणी आढळल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येईल याची सर्वानी दक्षता घ्यावी. तसेच पूणे मुंबई व इतर ठिकाणाहून आलेले व ज्यांच्या हातावर शिक्का मारला (HOME QUARANTINE) आहेत. त्यांनी घरातच बंदिस्त राहून विशेष काळजी घेण्याचे आवाहन सरपंच रंजना बेलेकर, पोलीस पाटील सरिता बेलेकर यांनी केले आहे.
तर, आज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तालुकाध्यक्ष, तरुण भारत पत्रकार व कोरोना दक्षता कमिटी सदस्य प्रकाश खतकर, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव बेलेकर, उपसरपंच सागर खतकर, बजरंग सुतार, सतीश बेलेकर, संभाजी खतकर, आदींनी रस्तावर गस्त घालण्याचे काम केले.