गारगोटी प्रतिनिधी
गडूदुवाडी व वेंगरूळ दरम्यान हेळ्याचा काठा या शेतात दुचकीला गव्याने जोरदार धडक दिल्याने तीघे जखमी झाले असून टूव्हीलरचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी येथून गावी येत असलेल्या भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ पैकी गडदुवादी येथील सुजीत सदाशिव डाकरेसह त्याला आणण्यासाठी गेलेल्या ऋषिकेश रमेश लाड, सनी बळवंत कोटकर गेले यांच्यावर हा हल्ला झाला. तर ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेला असंडोली ता. गगनबावडा येथील शेतकरीही गव्याच्या हल्ल्रात जखमी झाला आहे.
वेंगरूळ व गडदुवादी या दोन गावादरम्यान खूप शेती आहे. या शेतीला लागून जंगल आहे. त्यामुळे येथील संध्याकाळी गव्यांचे कळप पहावयास मिळतात. दरम्यान, वनरक्षक साळसकर यांनी तिघा जखमींवर प्रश्नाचा भाडीमार केला. गव्यांच्या पायाच्या खुणा दाखवल्यावर ते शांत झाले. जखमीवर गारगोटीत उपचार सुरु आहेत. घटनेचा पंचनामा वक्षेत्रपाल अधिकारी शैलेंद्र शेवडे, परिसर वनरक्षक आशिष साळसकर, वनपाल दशरत मोरबाळे, सत्ताप्पा करडे यांनी केला.








