प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने मंगळवारी रात्रीपासून क्लोजडाऊन जारी केला आहे. त्यामुळे दर मंगळवारी बंद असणारे भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय मंगळवारी दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, क्लोजडाऊनमुळे बुधवारपासून पुढील 14 दिवस प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती भुतरामहट्टीचे आरएफओ राकेश अर्जुनवाड यांनी दिली आहे.
मागील दोन महिन्यात भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात तीन सिंह व दोन वाघ दाखल झाले आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे.
मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने मंगळवारी रात्रीपासून क्लोजडाऊनचा निर्णय घेतला आहे. मात्र दर मंगळवारी बंद असणारे प्राणीसंग्रहालय मंगळवारी एक दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र बुधवारपासून पुढील 14 दिवस प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे.









