सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णयानुसार केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मुख्यालय क्षेत्रात कार्यान्वित झालेली आहे. त्यास अनुसरून सांगली शहरातील वार्ड क्रमांक १० मधील भीमनगर झोपडपट्टी तसेच राजर्षी शाहू कॉलनी नवीन वसाहत मधील झोपडपट्टीचे सध्या आहे.
त्याच ठिकाणी तेथे रहिवासी असणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काने जागा देण्यात यावी अशी मागणी याप्रभागाचे
नगरसेवक तथा प्रधानमंत्री आवास योजना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी आयुक्त नितिन कापडणीस यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार आज या परिसराची आयुक्त नितीन कापडणीस,नगर अभियंता भगवान पांडव, शाखा अभियंता वैभव वाघमारे यांनी पाहणी केली.यावेळी प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षा निंबाळकर,सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे व प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








