वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातली भिरोंडा येथील नदीमध्ये रविवारी बुडून मृत्यू पावलेल्या शुभम अर्जुन पाटील यांचा मृतदेह सोमवारी सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधून काढण्यात यश मिळवले.
ज्या ठिकाणी तो बुडला होता सदर ठिकाणाहून अवघ्याच अंतरावर त्याचा मृतदेह नदीच्या पात्रात सापडला. याबाबतची माहिती अशी की रविवारी शुभम पाटील व त्यांचे अन्य मित्र भिरोंडा येथे नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी आले होते . दुपारच्या सत्रानंतर आंघोळ करीत असताना शुभम पाटील अचानक दुर्दैवीरित्या बुडून निधन झाले. या संदर्भात माहिती वाळपईच्या अग्निशामक व पोलिस यंत्रणेला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन त्याच्या मृतदेहाची शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.. मात्र तो सापडू शकला नव्हता .आज पुन्हा एकदा सकाळी शोध मोहीम हाती घेण्यात आली. शोध मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर अर्ध्यातासातच त्याचा मृतदेह ज्याठिकाणी तो बुडला होता सदर पासून अवघ्या तंत्रावर त्याचा मृतदेह सापडला. याबाबत आवश्यक स्तरावर पंचनामा करून त्याचा मृतदेह बांबोळी येथील उत्तरीय तपासणी नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .घटनेचा संपूर्ण पंचनामा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक राघोबा कामत यांनी केले .यासंदर्भात वाळपई पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शुभम पाटील यांचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.शवविच्छेदन अहवालात याबाबत वाच्यता करण्यात आली असून यामुळे कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीसुद्धा या संदर्भात सविस्तर चौकशी करण्यात येईल अशा प्रकारची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. संपर्क साधला असता त्यांनी सांगितले रविवारी उशिरापर्यंत शुभम पाटील यांच्या मृतदेहाची शोधाशोध करण्याची प्रक्रिया सुरू होती . मात्र अंधार झाल्यामुळे त्याचा मृतदेह सापडला नव्हता. सोमवारी सकाळी खास कॅमेरा लावून त्याच्या मृतदेहाची शोधाशोध करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला.









