पाच महिला, आठ मुलांना पाठविले सुधारगृहात : महिला पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
ट्राफीक सिग्नलवर भिक्षा मागणाऱया पाच महिला व आठ मुलांचे संरक्षण करण्यात आले आहे. वेगवेगळय़ा खात्यातील अधिकाऱयांच्या मदतीने महिला पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. मानवी तस्करी थोपविण्यासाठी पोलीस दलात सक्रिय असलेले पथक, बाल कल्याण समिती, जिल्हा बालहितरक्षण विभाग, लहान मुलांसाठीची 1098 साठीची सहाय्यवाणी, कामगार खाते आदींच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात आला.
राणी चन्नम्मा सर्कल, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन इतर परिसरात त्या भिक्षाटणासाठी फिरत होत्या. त्यांना संरक्षण पुरविण्यासाठी व त्यांचे हित जपण्यासाठी त्यांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांसमोर हजर करण्यात आले आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून सध्या त्यांना
क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.









