चु ये / प्रतिनिधी
कावणे तालुका करवीर येथे घराची भिंत पाडताना अंगावर भित पडून प्रवीण बळवंत पाटील वय 29 याचा दुदैवी जागिच मृत्यू झाला . सोमवारी दुपारी ही घटना घडली. मयत प्रविण बळवंत पाटील हे आपल्या मित्रांना सोबत घेऊन घराची जुनी सिमेंट विटेची भिंत पाडत होते
भिंत अरुंद असल्यामुळे भिंतीवर उभारून भिंत पाडता येत नव्हते, त्यामुळे भिंतीच्या तळाला दोन्ही बाजू खोदत होते. घराच्या आतिल बाजूला भिंतीजवळ प्रविण होता. दोन्ही बाजूनी खोदकाम झाल्यामुळे दहाफुट उंचीची भित अचानक कोसळली त्यावेळी त्या भिंतीखाली सापडू नये म्हणून प्रवीण बाजूला होत असताना उभा असणाऱ्या सिमेंटच्या पाईपला धडकून पडला व कोसळलेल्या भिंतीखाली सापडला. सहकाऱ्यांनी तात्काळ भितीखालून त्याला बाहेर काढले. मात्र अंगावर पडलेल्या भिंती मुळे त्याला डोक्याला मार लागला त्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला पुढील उपचारासाठी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मनमिळावू, सर्वांना आदराने, आपुलकीने वागणाऱ्या प्रविणच्या मृत्युची बातमी गावात पसरताच गावावर शोककळा पसरली. अंत्यंसंस्कारावेळी आई व पत्नीने फोडलेला हंबरला हदय पिळवटून टाकणारा होता . प्रविणच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करत होते .
इतरांना वाचवलं .. अन् तोच अडकला
भिंत दोन्ही बाजूनी तळातून पाडण्यासाठी पोखरने सुरु होते भिंत हळूवार कलली त्यावेळी सावधगीरीत असणाऱ्या प्रविणने अरे भिंत कलायला लागलीय बाजूला व्हा. अस सांगत इतरांना सावध केल. त्यामुळे सहकारी मित्र काही क्षणात बाजूला झाले त्यामुळे त्यांच्यावरील धोका टळला मात्र इतरांना सावध करणारा प्रविण मात्र सिमेंटच्या नळ्याला धडकल्याने दुदैवाने त्याच भिंतीखाली अडकला अन् . मृत्युमुखी पडला .
प्रविणचा विवाह दोनमहिन्या पूर्वीच
कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून प्रवीण जबाबदारी पार पाडत होता ध्येयवादी आणि कष्टाळू वृत्तीच्या प्रवीणचा विवाह दोन महिन्यांपूर्वीच झाला होता नव्या संसाराला दोन महिने पूर्ण होताच नियतीची दृष्ट लागली. आणि प्रविणचा अपघाती मृत्यू झाला. अन् पाटील कुटूंबाचा आधारच संपला.प्रविणच्या पश्चात आईवडील पत्नी लहान भाऊ असा परिवार आहे.









