वार्ताहर/ आनेवाडी
आताच्या धावपळीच्या जगात शालेय विद्यार्थी घडविण्याची कला फक्त शिक्षकांच्या असून,विद्यार्थी कसा घड़ला पाहिजे,कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे हे त्यांच्या हातात असते कारण चांगले विचार व चांगल्या अभ्यासाबरोबर त्या शिक्षकाचे आचार विचार पाहुन विद्यार्थी घडत असतात,त्यामुळे विद्यार्थी व्यवहारी जगात जाताना टिकला व घडला पाहिजे हे सर्व घडविणारा शिक्षक हा सर्वश्रेष्ठ आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यानी केले,
रायगाव ता जावली येथील नवमहाराष्ट्र विद्यालय शिवनगर येथील मुख्याध्यापक राजेंद्र करंजे व क्रीडा शिक्षक मधुकर प़ोफळे यांच्या सेवा निवृती कार्यक्रमावेळी ते बोलत होते,याप्रसंगी प्रमुख उपस्थिति प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ सहसचिव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,आर के भोसले,चित्रपट निर्माते मधुअण्णा देशपांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी,एस डी कांबिरे,एन टी अटूगडे,ऍड.चंद्रकांत प़ोफळे,दिलीपराव सपकाळ यांची प्रमुख उपस्थिति होती,
डॉ राजेंद्र शेजवळ यानी आपल्या मनोगतामध्ये सेवानिवर्त्तिनंतरही हे शिक्षक एक वर्ष आपल्याच संस्थेत ज्ञान दानाचे काम करणार आहेत,आपल्या संस्थेमध्ये आशा प्रकारचे शिक्षक काम करत आहेत त्यामुळे चांगले विद्यार्थी घडत आहेत,मधुअण्णा देशपांडे म्हणाले,शिक्षक हा भावी पीढ़ी घडविनारा एक महत्वाचा घटक असतो सर्व कौटुंबिक परिवार सोडून तो ही कामे करत असतो त्यामुळे जगात शिक्षक हाच जीवनातील श्रेष्ठ गुरु आहे,
यावेळी राजेंद्र करंजे व मधुकर प़ोफळे यांनी आपल्या मनोगता मध्ये आजवर केलेल्या सेवेने अनेक विद्यार्थी घडले आहेत आज या सर्व गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे,याप्रसंगी अनेक विद्यार्थी या दोघांच्या सेवा निवृती कार्यक्रमात भावनिक झाले होते तर काही विद्यार्थिंनिनी आपल्या मनोगतामधुन या शिक्षकानी कसे आपल्यावर संस्कार करून शिक्षणाचे धड़े दिले हे सांगितले,यावेळी अनिता गायकवाड़ ,संजय निकम,श्रीकांत पाठक, यानी आपली मनोगते व्यक्त केली,याप्रसंगी सविता काकड़े,सुनीता फरांदे,नामदेव क्षीरसागर ,विट्ठल चव्हाण ,यशवंत फ़रांदे,शरद शिंदे,अमोल काकड़े,जयसिंग गुजर,उमेश तोडरमल,संजय महामुलकर,समाधान गायकवाड़,यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ महिला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठय़ा संखेने उपस्थित होते,प्रवीण डोने यानी सूत्रसंचालन केले तर आभार सुहास कुलकर्णी यानी मानले,









