ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेलने रौप्य पदकावर नाव कोरले. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक आहे.
क्लास 4 च्या अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यामध्ये यिंगने भाविनाचा 3-0 असा पराभव केला. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी भाविना पहिलीच भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे पराभव होऊनही भाविनाने भारतीयांची मने जिंकली आहेत.









