प्रतिनिधी/ बेळगाव :
जीवनाला कंटाळून गळफास घेऊन भावाने आत्महत्या केल्यानंतर मोठय़ा बहिणीचाही मृत्यू झाला. आचार्य गल्ली, शहापूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. भावा-बहिणीच्या मृत्य़ुमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यदुकुलेश रामचंद्र नायक (वय 61) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेच्या धक्क्मयानंतर त्यांची मोठी बहीण पंकजा रामचंद्र नायक (वय 70) यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून बुधवारी सकाळी दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
यदुकुलेश व पंकजा यांचे लहान भाऊ गोकुलेश रामचंद्र नायक (वय 59) यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 31 ऑगस्टच्या सकाळी 10 ते 3 सप्टेंबरच्या सकाळी 10.40 यावेळेत ही घटना घडली आहे. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
गोकुलेश हे धारवाडमधील एका इन्शुरन्स कंपनीत काम करतात. शेजाऱयांनी मंगळवारी रात्री त्यांना या घटनेची माहिती दिली. ते बेळगावला आल्यानंतर बुधवारी दरवाजा फोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता यदुकुलेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. जवळच त्यांच्या मोठय़ा बहिणीचाही मृतदेह आढळून आला.
यदुकुलेश व पंकजा हे दोघे वृद्ध भाऊ, बहीण आचार्य गल्ली येथे राहत होते. गेल्या सोमवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंकजा या आपल्या शेजारच्या महिलेला भेटल्या. भाऊ आणि आपण दोघांचे वय झाले आहे. घरात काहीही काम करता येईना. त्यामुळे आम्ही जीवनाला कंटाळलो आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर घरात जावून त्यांनी आतून कडी लावली. दोन दिवस त्यांच्या घरात दिवाही पेटला नाही. दरवाजाही उघडला नाही म्हणून शेजाऱयांनी डोकावून पाहिले. खोलीतून दुर्गंधीही सुटली होती. शेजाऱयांनी दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद आला नाही म्हणून धारवाड येथील गोकुलेश यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता दोन्ही मृतदेह आढळून आले. भावाच्या आत्महत्येच्या धक्क्मयातून मोठय़ा बहिणीचा मृत्यू झाला असावा, असे गोकुलेश यांनी पोलिसांना सांगितले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. जी. मोकाशी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.









