पलुस तालुक्यात कोरोना परिस्थिती आढावा बैठक
पलुस / प्रतिनिधी
ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यासह प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. सध्याची कोरोनाचि लाट ही मोठी आहे. यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. अशा सूचना जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम यांनी पलूस तालुक्यातील सर्व अधिकारी व प्रशासनाला केल्या.
पलूस पंचायत समिती या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम यांनी आढावा बैठक घेतली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, सपोनि विकास जाधव ,कैलास कोडग, संगीता माने, आरोग्य अधिकारी डॉ रागिनी पवार, मुख्याधिकारी सुमित जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अधिकराव पाटील यांच्यासह सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
तालुक्यातील कोरोना परिस्थिती उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना म्हणाले की, गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करा. तापाचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यासह प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे.
कोणत्याही कुटुंबांमध्ये एखाद्या व्यक्तीला तापाचे किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याचे होम क्वारंटाईन बंद करून तातडीने संस्थात्मक विलगीकरण करा. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी केली. तर आपल्याला रुग्ण शोधता येतील. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरातील एका व्यक्तीला कोरोणाची लागण झाली असेल तर त्याची ट्रीटमेंट विलगीकरण करून तातडीने करा.
जेणेकरून इतरांना त्याची बाधा होणार नाही. कोरोणाची रुग्ण संख्या कमी होणे हेच अत्यंत आवश्यक आहे. राज्य पातळीवर आपण सातत्याने काम करत असून जिल्ह्याकरीता व तालुक्यासाठी ऑक्सिजन व रेमडिसीवर औषध मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मार्ग निघत आहे .मात्र वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे हेच मोठे आव्हान आहे. ज्या गावांमध्ये जास्त रुग्ण संख्या आहे तेथे पोलिस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करा. गावच्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जागृततेबरोबर रुग्ण वाढ आपल्या गावात होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घ्यावी.








