प्रतिनिधी / बेळगाव
भारत विकास परिषदेच्यावतीने संपूर्ण वंदे मातरम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते. परिषदेच्या सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या एक सुरात वंदे मातरम् सादर करून भारतमातेला अनोखी मानवंदना दिली. शिवाय सावरकर उद्यानात ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ हे गीत देखील सामूहिकरित्या सादर
केले.
प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष सुहास सांगलीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संजय रायकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यानंतर विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक गायन झाले. तसेच सदस्या संगीता कुलकर्णी, अक्षता मोरे, स्वरा मोरे यांनी वैयक्तिक देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी प्रांत सेपेटरी स्वाती घोडेकर, हेमंत देशपांडे, पांडुरंग नायक, सुहास गुर्जर, डॉ. वद्रिंद यलबुर्गा, दीपक धुंगट, कुबेर गणेशवाडी, चंद्रशेखर इटी, कुमार पाटील, एम. जी. पाटील, विनायक घोडेकर, अशोक देसाई, जयंत कुलकर्णी यांसह सदस्य व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. योगिता हिरेमठ यांनी आभार मानले.









